12,99 €
inkl. MwSt.
Versandkostenfrei*
Versandfertig in über 4 Wochen
payback
6 °P sammeln
  • Broschiertes Buch

डिसेंबर १९९२ इरा दीक्षित आणि ओमर सिद्दिकी ही मुंबईत राहणारी स्वप्नाळू आणि खेळकर, किशोरवयीन जोडी होती. अयोध्येत सुरू असलेल्या दंगलींचे तीव्र पडसाद मुंबईमध्ये उमटल्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य उध्वस्त झालं. डिसेंबर २०१७ लंडनमध्ये स्थायिक झालेली डॉ. इरा गोडसे आणि तिचा मुलगा समीर, विमानातून अस्थिकलश घेऊन, मुंबईत येतात. सूडाच्या भावनेने पेटलेला, गांधीहत्येला जबाबदार असणाय नथुराम गोडसेंचा, त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध शोधून काढण्याची शपथ घेत समीर फरार होतो. इरा आपल्या मुलाचा वेडीपिशी होऊन शोध घेते. तिचा हा शोध अखेरीस पोलंडला येऊन संपतो. या प्रवासात तिला ध्रुवीकरण झालेलं वेगळंच जग दिसतं. त्या…mehr

Produktbeschreibung
डिसेंबर १९९२ इरा दीक्षित आणि ओमर सिद्दिकी ही मुंबईत राहणारी स्वप्नाळू आणि खेळकर, किशोरवयीन जोडी होती. अयोध्येत सुरू असलेल्या दंगलींचे तीव्र पडसाद मुंबईमध्ये उमटल्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य उध्वस्त झालं. डिसेंबर २०१७ लंडनमध्ये स्थायिक झालेली डॉ. इरा गोडसे आणि तिचा मुलगा समीर, विमानातून अस्थिकलश घेऊन, मुंबईत येतात. सूडाच्या भावनेने पेटलेला, गांधीहत्येला जबाबदार असणाय नथुराम गोडसेंचा, त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध शोधून काढण्याची शपथ घेत समीर फरार होतो. इरा आपल्या मुलाचा वेडीपिशी होऊन शोध घेते. तिचा हा शोध अखेरीस पोलंडला येऊन संपतो. या प्रवासात तिला ध्रुवीकरण झालेलं वेगळंच जग दिसतं. त्या जगात आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्या नावाखाली वर्ण, देवदेवता, मूर्तिपूजक, मूर्तिभंजक, गायी, डुकरं यांच्या नावाखाली एकमेकांशी संघर्ष करणारे लोक आढळतात. About the Author: मंजिरी गोखले जोशी ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या साईद बिझनेस स्कूलमधील विविधता व समावेशन विभाग प्रमुख आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या माजी सीईओ आहेत. त्या त्यांच्या कंपनी एलिफंट कनेक्ट द्वारे नेतृत्व प्रशिक्षण देतात आणि लिंक्डइनमार्फत सर रिचर्ड ब्रेन्सन यांच्या सल्लागार समितीवर निवड झाल्या होत्या. त्यांनी वृद्धांसाठी माया केअर ही धर्मादाय संस्था सुरू केली, जी दिव्यांगांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते, आणि या कार्यासाठी त्यांना इंग्लंडचा शी इन्स्पायर्स - एजंट ऑफ चेंज पुरस्कार मिळाला आहे. त्या ऑक्सफोर्डमधून 'मेजर प्रोग्राम मॅनेजमेंट' मध्ये पदव्युत्तर शिक्षित असून शेवनिंग शिष्यवृत्ती मिळवली आहे. हे त्यांचे सहावे पुस्तक आहे. त्या श्री. अभय जोशी यांच्या सहवासात तन्वी आणि मही या दोन मुलींच्या माता आहेत.