साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे कसे राजगडी पोहचले ते जरूर ऐका.
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno