जेव्हा स्त्रीयांच्या जीवनात आनंद असेल तेव्हा सृष्टी खऱ्या अर्थाने सुखी असेल. हे पुस्तक समर्पित करावे वाटते त्या स्त्री शक्तीला जिच्या हातून घडवली जातात प्रेमाची नाती, सक्षम व्यक्तित्व. पालकत्व ही एक कसौटी आहे. ज्या कर्वे आपण आपला ठसा उमटवून जातो या सृष्टीवर...त्यामुळे जरा समजुन उमजून ही वाटचाल करुया. About the Author: या पुस्तकाच्या लेखिका डॉ. दिपाली हेमंत जानुगडे ह्या स्त्रीरोग तज्ञ म्हणून गेली 25 वर्षे काम करित आहेत. कराड मधिल कृष्णा विश्वविद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज मध्ये काम करताना त्यांना अभिमान वाटतो या दरम्यान त्यांना मा. डॉ. सुरेश बाबा भोसले चान्सरलर कृष्णा विश्वविद्यापीठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रवासात स्त्रीयांच्या आरोग्यासाठी काम करताना अनेक कुटुंबांशी संबंध जोडले गेले, आयुष्याचे सार्थक झाले असे त्यांना वाटते. त्यांचे शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंन्ट मध्ये झाले, जिथे त्यांना आत्मीयता समर्पित आणि विदयाच्या उज्वल भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणारे शिक्षक लाभले तसेच आयुष्याच्या योग्य टप्यावर सत्यसाई सेवा संघटनेचे मानवी-मूल्यांवर आधारित शिक्षण मिळाले याबद्दल लेखिका शतशः ऋणी आहेत.
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno







