पुस्तकाबद्दल थोडेसे....एखाद्याच्या जीवनशैलीवर चांगल्या सवयी काय काय परिणाम करतात हे समजल्यानंतरच हे पुस्तक तयार झाले. चांगल्या सवयी अंगीकारल्यामुळे माझ्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडून आले. मला असे वाटते आणि माझी अशी प्रार्थना आहे कि माझे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणेल. ज्यांना हे पुस्तक वाचायची इच्छा आहे आणि ज्यांना आयुष्य बदलून टाकणारे अनुभव घ्यायचे आहेत त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.आपण जे करतो तसे आपण होतो. आपण सगळे सवयींपासून तयार झालेलो आहोत. आपले यश हे आपण दैनंदिन जीवनात ज्या सवयींचे अनुसरण करतो त्यावर मापले / मोजले जाते. या पुस्तकात ५२ भाग आहे. हे पुस्तक सवयींच्या महत्वाबद्दल आणि सोप्या पध्दतीने सवयी कशा लावून घ्याव्यात याबद्दल आहे. वर्तनाची पुनरावृत्ती करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही नवीन सवय लावणे ही पहिली गुरुकिल्ली आहे. दुसरी गुरुकिल्ली वर्तनाचे पुनरावृत्ती करण्यासाठी वेळ काढणे ही आहे. आपल्यापैकी बरेच जण पुरेसा वेळ नसण्याची तक्रार करत असतात.दैनंदिन जीवनातून फक्त ५ मिनिटांमुळे तुमच्या आयुष्यात एक जादुई बदल कसा घडेल हे समजण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. हे पुस्तक सगळ्यांसाठी लिहिले गेले आहे आणि यातील साधने आणि तंत्रांमुळे तुम्हाला सराव करण्यासाठी मदत होईल. एकदा का तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की तुम्हाला असे वाटेल की कुणीतरी तुमच्याशी बोलत आहे. क्रमाक्रमाने नवीन सवयी तयार करण्यासाठी अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत किती सवयी तुम्ही आत्मसात करुन घेता यासाठी मदत करेल. यात मी माझा वैयक्तिक अनुभव आणि माझ्यात झालेल्या बदलाचा प्रवास सांगितलेला आहे.
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno