शालेय जीवनात असतांनाच बिल गेट्स कम्प्युटर बनविण्यात तरबेज झाले होते, वयाच्या जेमतेम 20 व्या वर्षी आपला मित्र पॉल एलन समवेत 1975 साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट ची स्थापना केली होती. आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे, सुरुवातीस त्यांनी मायक्रो-कम्प्युटर ची प्रसिद्ध प्रोग्रामिंग लैंग्वेज "बेसिक" तयार करून यश मिळविलं, नंतर ते इतर कंपन्यांसाठी प्रोग्रामिंग लैंग्वेज आणि ऑपरेटिंग सिस्टम डेवलप करू लागले. त्यामुळे अल्पावधीतच सर्वदूर मायक्रोसॉफ्ट कंपनीची ओळख निर्माण झाली.पुढे 1980 साली विश्वातील सर्वात मोठ्या कंपन्यानपैकी एक IBM (इंटरनेशनल बिजनेस मशीन) ने मायक्रोसॉफ्ट पुढे IBM च्या नव्या पर्सनल कम्प्युटर करीता बेसिक सॉफ्टवेयर बनविण्यासाठी डील ऑफर केली, या डील नंतर बिल गेट्स च्या कंपनीने IBM करता PC Doc ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. 10 नोव्हेंबर 1983 ला बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोज ची घोषणा केली आणि त्यानंतर दोन वर्षांनी 1985 ला मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली यानंतर येणाऱ्या काही वर्षात जगातील सगळ्या पर्सनल कम्प्युटर वर त्यांच्या या ऑपरेटिंग सिस्टीम Windows ने आपला कब्जा मिळविला.यामुळे बिल गेट्स यांना मोठा फायदा झाला व 1987 साली वयाच्या 32 व्या वर्षी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व ठरले आणि लागोपाठ 11 वर्ष ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते. आपल्यातील प्रतिभा आणि विवेकशिलतेने बिल गेट्स लागोपाठ नवनवीन यश संपादन करीत होते, 1989 साली त्यांनी "मायक्रोसॉफ्ट ऑफिस" ची सुरुवात केली.मायक्रोसॉफ्ट ने आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मुळे यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत केली.
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno







